Nigdi : बस प्रवासादरम्यान सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस मधून निगडी ते कात्रज या मार्गावरून प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख 35 हजार 700 रुपयांचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

अंकिता नितेश साबळे (वय 25, रा. देहुगाव) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि त्यांच्या आई रविवारी सकाळी निगडी ते कात्रज या मार्गावरून पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होत्या. या बस प्रवासादरम्यान अज्ञातांनी अंकिता यांच्या आईच्या पर्स मधून 213 ग्रॅम वजनाचे सोने आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख 35 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.