Nigdi News: प्राधिकरणात मंगळवारी एक दिवसीय साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज – नगरसेविका शर्मिला बाबर, शब्दरंग साहित्य कट्टा (प्राधिकरण) आणि रुपेरी कडा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या मंगळवारी (दि.28) एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती शब्दरंग साहित्य कट्ट्याचे संयोजक चंद्रशेखर जोशी यांनी दिली.

मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत एक दिवसीय पहिले मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विनिता ऐनापुरे असून महापौर उषा ढोरे उद्घाटक आहेत. संमेलनात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका शैलजा मोरे, भारतीय विचार साधना (पुणे) अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, मनोरंजन, स्वगत, नाट्यछटा, एकपात्री सादरीकरण, अभिवाचन आणि काव्यकट्टा या विनाशुल्क असलेल्या साहित्यसत्रांचा लाभ सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.