Nigdi News: अनधिकृत 12 नळजोडवर कारवाई, 8 विद्युत मोटर्स जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील रुपीनगर, अजिंक्यतारा सोसायटी या भागामध्ये

‘फ ‘क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने एकूण 12 अनधिकृत नळजोड बंद केले. थेट नळाला लावलेल्या एकूण 8 विद्युत मोटर्स जप्त केल्या.

कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता शहाजी गायकवाड, कनिष्ठ अभियंता अभय कुलकर्णी, मीनल दोडल फ क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग यांच्या पथकाने केली. मीटर निरिक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे कर्मचारी, मनपाचे प्लंबर, फिटर, मजूर, वायरमन,अतिक्रमण गाडी चालकासह  एकूण 21 जणांच्या पथकात समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.