Nigdi News : 350 कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या कुटुंबास अन्नधान्य किट वाटप

एमपीसीन्यूज : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, नृत्यकलामंदिर निगडी, कृष्णकुमार गोयल फाउंडेशन पुणे, अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन निगडी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 350 चित्रपट -नाट्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या परिवारास अन्न धान्य किट वितरित करण्यात आले.

चिंचवडगावातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, तळेगावात विठ्ठल मंदिर, पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृह व निगडी येथील ज्ञान ज्ञानप्रबोधिनी येथे हा कार्यक्रम पार पडला. माजी प्रांतपाल सीए लायन अभय शास्त्री, प्रतिभा इंटरनॅशन विद्यालयाचे संस्थापक दीपक शाह, नवनिर्वाचित प्रांतपाल लायन हेमंत नाईक आदींच्या हस्ते धान्य वाटप झाले लायन तेजश्री आडीगे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. त्यांना लायन उमा पाटील यांनी सहकार्य केले.

लोकनाट्य व सिने अभिनेत्री जयमाला इनामदार, लेखक/दिग्दर्शक अभिनेता विजय पटवर्धन, डॉ. संजीवकुमार पाटील, गायिका- अभिनेत्री सायली राजहंस, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संचालिका शोभा कुलकर्णी, लावणी नृत्यांगना सुजाता कुंभार, जेष्ठ लोकनाट्य कलाकार गाढवाचं लग्न फेम वसंत अवसरिकर, बालगंधर्व परिवाराचे उपाध्यक्ष योगेश देशमुख, सचिन वाघोडे, सूप्रिया धाईंजे, ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष शर्मिला महाजन, सुषमा वैद्य, सचिन कुलकर्णी, अजित देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, वसंत देशपांडे, दीपा जाधव, सुनील जाधव, लायन्स प्रांताच्या सेक्रेटरी सुनिता चिटणीस, प्रकल्प अधिकारी काश्मीर नागपाल, बलविंदरसिंग राणा उपस्थित होते.

या अन्नदान उपक्रमास लायन्स क्लब ऑफ तळेगाव, लायन्स क्लब पुना- निगडी, लायन्स क्लब मेट्रोपॉलिस लायन्स क्लब पुणे सिनियारस, लायन्स क्लब पुना -पिंपरी चिंचवड, लायन्स क्लब पुना कोथरूड, लायन्स क्लब पुना- गणेशखिंड, लायन्स क्लब पुणे- पिंपरी गोल्ड या संस्थांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.