Nigdi News: नामवंत कलाकार आणि हजारो रसिकांच्या उपस्थितीत रंगली दिवाळी स्वरपहाट मैफल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ व मैत्री महिला व्यासपीठ व राजमुद्रा ग्रुप प्रस्तुत दिवाळी स्वर पहाट कार्यक्रम आज (गुरुवारी) प्राधिकरणामध्ये उत्साहात संपन्न झाला.

पिंपरी-चिंचवड मध्ये प्रथमच सर्वच कलाकार एका मंचावर उपस्थित होते. यामध्ये जावेद अली, साधना सरगम, विश्वजित बोरवणकर, प्रिया बर्वे, श्रेया बुगडे हे कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात जावेद अली, साधना सरगम, विश्वजीत बोरवणकर, प्रिया बरवे यांनी नागरिकांची मने जिंकली. जवळपास पाच तास हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला 12 ते 13 हजार नागरिकांशी उपस्थिती होती.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, अनुप मोरे, उद्योजक तुषार कलाटे,  शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.