Nigdi News: वीज बिल भरण्यास मुदतवाढ द्या, वीज कनेक्शन तोडू नका – अमित गावडे

0

एमपीसी न्यूज – कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली असून महावितरणने बिल वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावला आहे. एकाचवेळी संपूर्ण वीज बिल न भरल्यास कनेक्शन तोडले जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. वीज बिल भरण्यास मुदतवाढ द्यावी. बिलांचा भरणा करण्यासाठी टप्पे करुन द्यावेत. एकाही घरातील वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी शिवसेना नगरसेवक, विधी समितीचे सदस्य अमित गावडे यांनी केली आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या निगडीतील कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन होता.

_MPC_DIR_MPU_II

लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिले आली असून ती वाढीव असल्याचा सर्वांचाच आक्षेप आहे. सध्या महावितरणने बिल वसुलीची मोहिम हाती घेतली आहे. अधिकारी वसुलीसाठी निगडी, प्राधिकरण परिसरात फिरत आहेत.

नागरिकांकडे एकाचवेळी संपूर्ण बिल भरण्यासाठी एवढे पैसे उपलब्ध नाहीत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे बिलांचा भरणा करण्यासाठी टप्पे करुन द्यावेत. टप्प्या-टप्याने वीज बिले घ्यावीत. वीज कनेक्शन तोडू नये, अशी विनंती नगरसेवक गावडे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment