Nigdi News: सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांचा जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत हे महापालिका सेवेतून 28 फेब्रुवारी 2022 रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाची पावती म्हणून पिंपरी-चिंचवडकर नागरिकांच्या वतीने प्रवीण लडकत यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, कॅप्टन जी एस कदम हॉल, सेक्टर 25, प्राधिकरण निगडी येथे बुधवारी (दि. 2 मार्च 2022) सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

प्रवीण लडकत हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सहशहर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. नियत वयोमानानुसार ते 28 फेब्रुवारी 2022 रोजी निवृत्त होत आहेत. जनतेच्या अपेक्षा, गरज ओळखून काम करणा-या प्रामाणिक अधिकारी वर्गातील एक असणा-या, शहरातील सर्व संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करुन महापालिका प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांना जोडणारे ते अधिकारी आहेत.
त्यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व नागरिकांतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=uVLyW-2i5XI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.