Nigdi News: सावरकर मंडळाच्या लघु लेखन स्पर्धेत शालेय गटात श्रीनिवास हसबनिस, खुल्या गटात हेमंत कुलकर्णी प्रथम

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 138 व्या जयंतीचे व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या 38 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून  मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयामार्फत घेण्यात आलेल्या लघुलेखन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.  शालेय गटात श्रीनिवास हसबनिस, खुल्या गटात हेमंत कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयामार्फत  अवघ्या 10 ओळीत प्रभावीपणे स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. गुगलमिटच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली.  ही  स्पर्धा शालेय गट व खुला  अशा‌ दोन गटात घेण्यात आली.

एक नाविन्यपूर्ण लेखन स्पर्धा व त्या माध्यमातून सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन असा‌ एकंदरीत ढाचा होता. या स्पर्धेसाठी , स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद नोंदवला .खुल्या गटाच्या माध्यमातून 227 व‌ शालेय गटातून 67 जणांनी सहभाग घेतला.

दहावीपर्यंतच्या शालेय गटात श्रीनिवास हसबनिस (501 रुपये), अनघा बकरे (301) आणि वेदश्री देशमुख (201 रुपये) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. गार्गी कानेटकर, शिवराज जोशी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तर, खुल्या गटात हेमंत कुलकर्णी (501 रुपये), यांनी प्रथम क्रमांक मिळविला.  द्वितीय क्रमांक विजय बक्षी (301 रुपये) यांनी  आणि तृतीय क्रमांक सीताराम करकरे (201 रुपये)  यांनी पटकावला.  तर, मंजुषा मुळे, सुरेश शेठ यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

रविकांत कळंबकर, विश्वास करंदीकर व डॉ . अंजली ओक यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. उत्कृष्ट प्रवेशिकांचे वाचन करण्यात आले. प्रत्येक गटातील 5 उत्कृष्ट साहित्याला रोख स्वरूपात पारितोषिके जाहीर करण्यात आली. चंद्रशेखर जोशी यांनी  स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.

मंडळाचे सचिव  प्रदीप पाटील यांनी प्रस्तावना केली.  कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी  आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचे सहकार्य  केले.  श्रीकांत मापारी, विवेक जोशी अन्य मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.