Nigdi : बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे दालन सुरु, पालिकेकडून नोटीस

एमपीसी न्यूज – इमारतीचे बांधकाम अर्धवट असताना आणि बांधकाम पूर्णत्वाचा (Nigdi)दाखला नसतानाही निगडी प्राधिकरणात ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नवीन दालन सुरू करण्यात आले आहे. यावर सोशल मिडीयातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने ‘पीएनजी’ला नोटीस देत समज दिली आहे. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे निगडी प्राधिकरण येथे आपले नवीन दालन सुरू करण्यात (Nigdi)आले आहे. 2800 चौरस फूट क्षेत्रफळात हे दालन उभारले आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले नाही.  खालच्या  मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यातच दालन सुरु केले आहे.

 

Pune: प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ‘पी.म.पी.एम.एल’ सेवा निवृत्त सेवकांचे उपोषण तूर्त मागे 

 

काम अर्धवट असताना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसतानाही दालन सुरु केल्याने सोशल मिडीयातून सवाल उपस्थित केले जात होते. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसतानाही दालन कसे सुरु झाले, महापालिका का कारवाई करत नाही, असे सवाल  उपस्थित केले जात होते.

याबाबत बोलताना महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले की, ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या इमारतीचे काम पूर्ण झाले नाही. त्यांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला  घेतला नाही. त्यांना समज देण्यात आली आहे.     त्यांच्याकडून प्रशमन (दंड) शुल्क वसूल करण्यात येणार आहे. चालू बांधकामावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नसते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.