Talegaon Dabhade : विन्यासा योग वर्गाच्या महिलांनी महिला दिन व स्नेहसंमेलन केले साजरे

एमपीसी न्यूज – विन्यासा योग वर्गाच्या महिलांनी 13 मार्च रोजी मोठ्या उत्साहात (Talegaon Dabhade) महिला दिन व स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विजया इनामदार, शैलजा धोंगडे, दीपाली मरकळे, पौर्णिमा पिल्ले यांच्या हस्ते झाले.

सुरुवातीला गणेश वंदन व स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर (Talegaon Dabhade) पोवाडा, एकपात्री नाटक, आरोग्याची लावणी, बैठकीची लावणी, विविध सामूहिक नृत्य तसेच आरोग्य गीते असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिलांनी सादर करत केले.

Pune: विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावर उद्यापासून वाहतुकीत बदल

या कार्यक्रमाचे उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी केवळ टाळ्या नाही तर शिट्ट्या वाजवून देखील दाद दिली. महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी विन्यासा योग वर्गाच्या संचालिका सीमा इनामदार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.