Nigdi : खांदेश मराठा मंडळातर्फे महिला दिनानिमित्त स्वयंरोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – निगडी येथील खांदेश मराठा मंडळाच्या (Nigdi) वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वयंरोजगार व उद्योजकता मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी माजी आयुक्त रवी पाटील, महा फर्मा कंपनीचे संचालक डॉ संजय पांढरे,आयुष् मंत्रालयचे सल्लागार डॉ साहेबराव मेंगडे,अभिनव फार्मर्स क्लबचे संचालक ज्ञानेश्वर बोडके,खांदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष मधुकर पगार, उद्योजिका श्रध्दा कंडुडे, समर्थ क्रॉपचे संचालक प्रशांत गवळी आदी उपस्थित होते.

Chinchwad : ‘एमआयटी एडीटी’च्या प्रांजलीला मिनी गोल्फमध्ये रौप्य

सुनीता पाटील (चष्मा विक्रेत्या), वर्षा सोनवणे( खाद्यपदार्थ विक्रेत्या), दिपाली वाळके(सेंद्रिय शेती), देवयानी कुलकर्णी (मूत्रपिंड दात्या) ॲड देवयानी पाटील,आशा काकडे, श्रद्धा कारले, राणी शिंदे, शोभा चौधरी,सुनंदा अशोक पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाची (Nigdi) यशोगाथा सांगितली. तसेच यांना यशस्वी महिला उद्योजिका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी तर आभार खान्देश मराठा मंडळाचे सचिव प्रदीप शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.