_MPC_DIR_MPU_III

Nigdi : एका दुचाकीस्वाराकडून दोन किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका दुचाकीस्वाराकडून दोन किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) रात्री काचघर चौकात करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

सचिन शंकर पवार (वय 26 रा. काळभोरगोटा, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई अजित लिंबराज कुटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीमधील काचघर चौकात एक तरुण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी परिसरात सापळा रचून सचिन याला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ सुमारे 2 किलो 125 ग्रॅम वजनाचा अंदाजे 53 हजार 125 रुपयांचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह गुन्ह्यासाठी वापरलेली 30 हजार रुपयांची दुचाकी व रोख 400 रुपये पोलिसांनी जप्त केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.