Nigdi : पीएमपीएल बस प्रवासात महिलेचे गंठण चोरीला

एमपीसी न्यूज- निगडी येथील (Nigdi) लोणावळ्याला बस प्रवास करीत असताना एका महिलेचे 54 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरीला गेले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.28) दुपारी निगडी लोणावळा पीएमपीएल बसमध्ये घडला.

याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी असून निगडी पोलिसांनी अज्ञात इसमावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवून महिलेची पावणे पाच लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या निगडी येथू लोणावळा कडे जाणाऱ्या येथील बस मध्ये चढल्या मात्र बस मध्ये गर्दी होती या गर्दीचा फायदा घेऊन चोराने फिर्यादीच्या गळ्यातील 11 ग्राम वजनाचे 54 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. मिळालेल्या माहितीवरून निगडी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.