Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – सकाळी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 9) सकाळी नऊच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली.

सुमित रमेश सूर्यवंशी (वय 30, रा. ओटास्किम निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर ढवळे (वय 25), महादेव ढवळे (वय 32, दोघे रा. ओटास्किम निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित आणि आरोपी मयूर यांचे सोमवारी सकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावरून आरोपींनी थोड्या वेळाने पुन्हा येऊन सुमित यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये सुमित गंभीर जखमी झाले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.