Pimpri : ‘यापुढे विधी समितीचा विषय थेट महासभेकडे पाठविल्यास गय करणार नाही’

विधी समिती सभापतींचा प्रशासनाला इशारा 

एमपीसी न्यूज – विधी समितीचे अधिकार अबाधित ठेवावेत.  विधी समितीचे विषय समितीमार्फतच सर्वसाधारण सभेसमोर गेले पाहिजेत. यापुढे विधी समितीचा एकही विषय थेट महासभेकडे पाठविल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा विधी समितीच्या सभापती अश्विनी बोबडे यांनी प्रशासनाला दिला.  

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी महापालिका विधी समितीची पाक्षिक सभा आज (शुक्रवारी) पार पडली. सभापती अश्विनी बोबडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. तत्पुर्वी बोबडे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. विषय समितीचे अधिकारी अबाधित ठेवण्याची मागणी केली.  महापालिकेत अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. सौरभ गायकवाड यांना घेण्यास, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. लक्ष्मण गोफणे यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच आमदार दलित वस्ती विकास निधी अंतर्गत पिंपरी, मिलिंदनगर येथील सामाजिक व सांस्कृतिक क्रेंद याठिकाणी विद्युत विषयक सोई-सुविधा पुरविणे या कामाच्या अंदाजपत्रकीय 26 लाख 45 हजार रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोबडे म्हणाले,  विधी समितीचे अधिकार अबाधित ठेवावेत. थेट सर्वसाधारण सभेकडे विषय पाठवू नयेत. विधी समितीच्या अधिकारात येणारा विषय प्रथम समितीकडेच पाठविण्यात यावा. समितीची मान्यता घेऊन  संबंधित विषय महासभेकडे पाठविण्यात यावेत. विधी समितीचे अधिकार डावलण्यात येऊ नयेत. यापुढे विधी समितीचा एकही विषय थेट महासभेकडे मान्यतेसाठी पाठवू नये. विधीच्या मान्यतेविना विषय महासभेकडे पाठविल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.