No Street lights : वाकड येथील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे बंद, नागरिकांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज : वाकड मधील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे गेले वर्षभर बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.(No Street lights) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्वरित याठिकाणचे पथदिवे सुरू करावेत अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

याबाबत माहिती देताना शोनेस्ट टॉवर्स हाऊसिंग सोसायटीच्या सेक्रेटरी तेजस्विनी ढोमसे सवाई म्हणाल्या की, दत्त मंदिर रोड वरून पुणे बंगळुरू हायवेला पाच अंतर्गत रस्ते आहेत. या अंतर्गत रसत्यांची लांबी प्रत्येकी 500 ते 750 मीटर आहे. दोन वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व सुशोभीकरण सुरु केले होते. त्यावेळेस पथदिव्यांचे पोल्स काढण्यात आले होते. आता काही ठिकाणचे काँक्रिटीकरण पुर्ण झाले असून नवीन पथदिवे व त्यांचे पोल्स लावण्यात आले आहेत. पण अद्यापही ते सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अंधारातूनच वाट काढावी लागत आहे.

संतोष कणसे चेअरमन, गणेश इंस्पिरिया हाऊसिंग सोसायटी म्हणाले की, दत्त मंदिर रोड हून गणेश इन्स्पिरिया, शोनेस्ट टॉवर मार्गे पुणे बंगलूरू हायवे कडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर गेले वर्षभर पथदिवे नव्हते. आता पथदिवे लावण्यात आले आहेत पण ते चालू अवस्थेत नाहीत.(NO Street lights) त्यामुळे या रस्त्यावर अंधार असतो. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्वरित हे दिवे सुरु करून लोकांचा त्रास दूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Pimpri Corona Update : शहरात आज 46 नवीन रुग्णांची नोंद; 30 जणांना डिस्चार्ज

 

येडेन टॉवर निवासी पुरुषोत्तम नायडू म्हणाले की, येडेन टॉवर समोरील रसत्यावरील पथदिवे गेले 2 ते 3 महिने बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर अंधार असतो.(No Street lights) रात्रीच्या वेळी कामाला जाणाऱ्या किंवा कमावून घरी परत येणाऱ्या महिलांना या अंधारातून येताना असुरक्षित वाटते. या अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटना किंवा एखादा अपप्रसंग घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

प्रल्हाद चव्हाण सेक्रेटरी लॅटिट्यूड हाउसिंग सोसायटी यांनी देखील पथदिव्यांचा समस्येवर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात की, माऊली सोसायटी ते रेलिअन्स रिलायन्स मॉल ते डॉमिनोज ह्या रस्त्यावरील पथदिवे खूप महिने झाले बंद आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (No Street lights) विद्युत विभागाशी संपर्क साधला असता कनिष्ठ अभियंता सुनील भालेराव म्हणाले की, पुढील आठवड्याभरात वाकड मधील सर्व अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे सुरू करण्यात येतील.असं आश्वासन दिलं आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.