Group personal accident insurance: न्यु इंडिया एश्योरन्स कंपनीकडून पीएमपीएमएलच्या दोन सेवकांना प्रत्येकी १० लाख रुपये अपघाती विमा मंजूर

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ‘न्यु इंडिया एश्योरन्स कंपनीची’ समूह अपघात विमा योजना (Group personal accident insurance) लागू करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे कार्यरत असलेल्या दोन सेवकांचे अपघाती निधन झाल्याने त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये रक्कमेचा विमा क्लेम मंजूर झाला असून त्यांच्या वारसांना सदर रक्कमेचा धनादेश सपूर्द करण्यात आला. 

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना गतवर्षी पासून ‘न्यु इंडिया एश्योरन्स कंपनीची’ समूह अपघात विमा योजना (Group personal accident insurance)  लागू करण्यात आली आहे. गतवर्षी महामंडळाच्या सेवेत असलेल्या सर्व ९३७६ अधिकारी व कर्मचारी यांची प्रत्येकी १७५ रुपये रक्कम वार्षिक प्रीमियम म्हणून पगारातून कपात करण्यात आली होती. जर ही पॉलिसी चालू असताना विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झालेस त्याच्या वारसास १० लाख रुपये रक्कमेचा अपघाती विमा रक्कम देण्याची तरतूद आहे.

Employment Fair : पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

त्यानुसार विमा पॉलिसीच्या कालावधी मध्ये अपघाती निधन झालेल्या महामंडळाकडील चालक सेवक कै. राजेश जयराम गायकवाड यांच्या वारस पत्नी श्रीमती छाया राजेंद्र गायकवाड व हेल्पर सेवक कै. जगदीश चंद्रकिशोर ठाकूर यांच्या वारस पत्नी श्रीमती कल्पना जगदीश ठाकूर यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. श्री. योगेश होले, कामगार व जनता संपर्क अधिकरी मा. श्री. सतीश गाटे, न्यु इंडिया एश्योरन्स कंपनीच्या बाजीराव रोड शाखेचे शाखा प्रमुख मा. श्री. देवदत्त वैद्य, कर्मचारी श्रीमती लुईजा रॉड्रीक्स यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजूर १० लाख रुपये विमा रक्कमेचे धनादेश सपुर्द करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.