Pimpri Corona Update : शहरात आज 46 नवीन रुग्णांची नोंद; 30 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 46 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली.(Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 71 हजार 906 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 197 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 187 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका

तर, 10 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहेत.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 241 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 82 हजार 609 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.