Pune : आता पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत ‘हिरकणी कक्ष’

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांत येत्या महिनाभरात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर याबाबतचे आदेश देण्यात आले.

महापालिका मुख्य इमारतीमध्ये हिरकणी कक्ष आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आलेल्या महिलांना लहान मुलांना स्तनपानासाठी आडोशाचा आधार घ्यावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन हे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्याचे आदेश राज्यशासनानेही दिलेले असले, तरी महापालिकेने त्याला हरताळ फासला. तर, नगरसेविकांनी आंदोलन केल्यानंतर मुख्य इमारतीमध्ये हा कक्ष उभारण्यात आला.

आयुक्तांनी याबाबत अधिका-यांकडे विचारणा केली असता, फक्त मुख्य इमारतीमध्येच कक्ष असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांत ‘हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश दिले आहेत. आता यावर प्रत्यक्ष कशी कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.