Career Opportunities : आता दहावी, बारावीनंतरच मिळवा करिअरच्या पंचतारांकित संधी!  

एमपीसी न्यूज – नुकतेच लागलेले दहावी आणि बारावीचे रिझल्ट, ऑगस्ट  महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारी 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा… यामुळे सर्व पालक आणि विद्यार्थी योग्य शाखा निवडून यशस्वी करिअर निवडण्याच्या प्रयत्नात व्यग्र आहेत. अपुरी आणि मर्यादित माहिती या मुख्य अडथळ्यामुळे सर्वसाधारणपणे सायन्स, आर्टस, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, बी. बी. ए., बी. सी. ए. अशा पारंपरिक पर्यायांकडे भरपूर विद्यार्थ्यांचा ओढा असतो.

पण या रूढ अभ्यासक्रमांबरोबरच, व्यवसाय आणि करिअरच्या वेगळ्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. अशीच एक उद्योगप्रधान, कौशल्य विकासावर भर देणारी आणि आंतरराष्ट्रीय करीयरच्या संधी उपलब्ध करून देणारी शाखा म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट! 10 वी नंतर लगेचच या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र बोर्डाच्या Higher Secondary Vocational Courses (HSVC) या शाखेद्वारेप्रवेश घेता येतो. या शाखेतील ‘फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम पंचतारांकित करिअरच्या अनेक संधीची कवाडे खुली करत आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत HSVC हा चौथा पर्याय निवडून ‘फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम निश्चित करावा.

हा अभ्यासक्रम घेऊन 12 वी पूर्ण झाल्यावर लगेचच स्वतःचा व्यवसाय सुरु करणे सहज शक्य आहे. तसेच हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राबवत असल्यामुळे 12 वी नंतर हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मधील शिक्षणाच्या पुढील संधीही उपलब्ध होतात. प्रात्यक्षिकांवर भर देणारा अभ्यासक्रम, सहज समजतील असे सोपे विषय आणि मर्यादित स्पर्धा असा हा  वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणे सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांनाही सहज शक्य आहे.

जे विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा HSVC या शाखांमधून 12 वी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना या झपाट्याने विस्तारणाऱ्या क्षेत्रात आपले भवितव्य घडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची B.Sc. Hospitality Studies ही पदवी योग्य पर्याय आहे. तीन वर्षांची पदवी सहा सत्रात विभागली आहे. फक्त बारावीच्या गुणांवर थेट प्रवेश, व्यक्तिमत्त्वात आणि संभाषण कौशल्यात होणारे अमुलाग्र बदल, मर्यादित स्पर्धा आणि सोपे विषय असा हा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम म्हणजे आतंरराष्ट्रीय करिअरची संधी मिळवण्याचा व्हिसा आहे.

देश विदेशातील पंचतारांकित हॉटल्समध्ये करिअरच्या संधी, उत्तम मोबदला देणारा स्वतःचा व्यवसाय, फ्लाईट किचन, इंडस्ट्रिअल केटरींग, क्रुझ लाईन, फास्ट फूड आउटलेट, आणि फाईन डायनिंग  स्पेशालीटी रेस्टॉरंट अशा अनेक करिअर ऑप्शन्स मधून सुयोग्य निवड करून विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडवू शकतात. पर्यटन क्षेत्रातील शाश्वत विकास, जगभरात विविध खाद्य संस्कृतींची विलक्षण लोकप्रियता व देश-विदेशातील पर्यटकांची वाढती संख्या यासारख्या पायाभूत घटकांवर आधारलेले हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत असल्यामुळे कायमच कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत जाणार आहे.

Novel’s NIBR College of Hotel Management, निगडी, हे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव आहे. 2003 पासून कार्यरत असलेल्या या संस्थेचा हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन क्षेत्रातील अनुभव प्रचंड मोठा आहे. 11 वी 12 फूड प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी आणि बी. एस. सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हे अभ्यासक्रम गेली अनेक वर्ष NOVEL’S NIBR यशस्वीरीत्या राबवत आहे.

सुसज्ज प्रात्यक्षिक कक्ष, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असणारा अनुभवी शिक्षक वृंद, बहुराष्ट्रीय नामांकित पंचतारांकित हॉटेल्ससोबत इंटरनॅशनल प्लेसमेंटसाठी टायअप्स या सर्व घटकांमुळे संस्थेचे अनेक गुणवंत विद्यार्थी स्वतःचे यशस्वी करिअर घडवत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया आणि इतरही अनेक देशांमध्ये ‘नोव्हेल’चे शेकडो विद्यार्थी उत्तम करिअर करत आहेत.

अजूनही संधी गेलेली नाही. आपल्या पुढील शैक्षणिक प्रवासाची दिशा सुनिश्चित करण्याआधी हॉटेल मॅनेजमेंट या जागतिक पातळीवर आश्वासक करिअर निर्माण करून देणाऱ्या पर्यायाची माहिती अवश्य करून घ्या.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करा

https://forms.gle/wAA9GrruSeroKoJs8

अधिक माहितीसाठी संपर्क – 9881540066/9881520066

*Novel’s NIBR College Of Hotel Management*

Sant Takuram Vyapar Sankul, Opp. St.Ursulas High School, Nigdi, Pradhikaran, Pune -411044

Phone-  *9881540066/9881520066*

www.nibrindia.com

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.