Vehicle Theft : दुचाकीच्या शोरूम मधून नव्याको-या दोन दुचाकी चोरीला

तळेगाव दाभाडे मधून चार तर चाकण मधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे दुचाकीच्या शोरूम मधून अज्ञात चोरट्यांनी दोन नव्या को-या दुचाकी चोरून नेल्या. ही घटना 12 जुलै रोजी खांडगे ऑटो मोबाईल हिरो टुव्हीलर शोरूम मध्ये उघडकीस आली.

विकी किसान कुडाळकर (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे खांडगे ऑटो मोबाईल हिरो टुव्हीलर शोरूम आहे. या शोरूम समोरील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या नवीन दुचाकींमधून अज्ञात चोरट्यांनी हिरो सुपर स्प्लेंडर आणि स्प्लेंडर प्लस या एक लाख 39 हजार 860 रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरून नेल्या. 12 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

बुधवारी तळेगाव परिसरातून चार दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर चाकण मधून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.