Nyasa React About Herself: या क्वारंटाइन काळात न्यासा घेतेय स्वत:चा शोध…

Nyasa React About Herself: Self-discovery during this quarantine 'ख-या न्यासाचा मी शोध घेत आहे. वयाच्या या टप्प्यावर तुमच्या बद्दल दररोज काही तरी नवीन समजणे हे आवश्यक असते.

एमपीसी न्यूज- बॉलिवूडची स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यापैकीच एक म्हणजे अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा. ‘क्वारंटाइन टेप’ या नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये काजोल आणि न्यासा यांनी आपली मते मांडली आहेत. त्यात न्यासा आपली मते मांडत आहे. त्यात ती स्वत:ला शोधत असल्याचे म्हणत आहे. यात काजोल आणि न्यासाने स्वत:च्या आवाजात काही गमती शेअर केल्या आहेत.

या व्हिडिओला न्यासाच्या स्वगताने सुरुवात होते. ती म्हणते, ‘ख-या न्यासाचा मी शोध घेत आहे. वयाच्या या टप्प्यावर तुमच्या बद्दल दररोज काही तरी नवीन समजणे हे आवश्यक असते.

एका टीनएजरसाठी स्वत:चा शोध घेणे ही अत्यंत जरुरीची गोष्ट असते. त्यामुळे आपला चांगला विकास होतो’.

‘सार्वजनिक जीवनात लोकांकडून आम्हाला नेहमीच महत्व दिले जाते. पण माझ्या आई-वडिलांनी मला त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकवले आहे. माझ्या बाबांनी मला एक मोलाचा सल्ला दिला आहे, की तुझे मौन हेच तुझी काळजी घेईल.

म्हणजेच मी शांत राहणे हेच योग्य आहे. त्यांनी मला नेहमीच याची जाणीव करुन दिली आहे की मी एखाद्या गोष्टीसाठी कष्ट घेतले तर मी ते करु शकते. म

ला माहितेय मी काहीही केले तरी त्याकडे माझ्या आईवडिलांचे संस्कार म्हणूनच बघितले जाईल. वरकरणी मी किती चांगली आहे, अशी लोक माझी स्तुतीदेखील करतात. पण मला माझ्यातील चांगल्या वाईट गोष्टींची जाण आहे’.

काजोलने देखील त्या दोघींच्या आई आणि मुलीच्या नात्याविषयी बोलताना सांगितले की, तिला न्यासाचा अभिमान आहे.

यावर न्यासा म्हणाली की, ‘मला माहितेय की मी आणि आई एकमेकींसारख्या आहोत. ती जरी दाखवत नसली तरी ती खूप समंजस आहे. मला माहितेय की ब-याच वेळा आम्ही दोघी पटकन व्यक्त होतो, आमच्याकडे कोणतेही फिल्टर नाहीत’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like