OMG 2 : ओएमजी 2चा ट्रेलर युट्युब वर प्रदर्शित; अक्षय कुमार महादेवाचा दूत तर पंकज त्रिपाठी आस्तिक नागरिकाच्या भूमिकेत

एमपीसी न्यूज – 2012 मध्ये आलेल्या ओएमजी – ओ माय गॉड या चित्रपटाच्या यशानंतर आता अवघ्या अकरा वर्षांनी त्याचा दुसरा भाग येत आहे. गुरुवारी (दि 3) चित्रपटाचा ट्रेलर (OMG 2) युट्युबवर प्रदर्शित झाला असून अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रमुख भूमिकेत आहेत. ओएमजी 2  हा 11 ऑगस्टला प्रदर्शित होत असून गदर 2 बरोबर या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर नक्कीच सामना होईल.

PCMC : शहरातील रस्त्यांची 15 ऑगस्टपासून यांत्रिकी पद्धतीने साफसफाई

ओएमजी 1 चित्रपट गाजल्यामुळे या चित्रपटाची भारतीय सिनेफाईल फार आतुरतेने वाट पाहत आहेत. परेश रावल सारख्या कर्तृत्ववान अभिनेत्याची जागा या चित्रपटांमध्ये पंकज त्रिपाठी यांनी घेतली आहे. मिर्जापुर, गँग्स ऑफ वासेपुर आणि आणि लुडो या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करून पंकज त्रिपाठी यावेळी एका आस्तिक नागरिकाची भूमिका करत आहे.

चित्रपटाचा टिझर जेव्हा रिलीज झाला होता. तेव्हा बऱ्याच जणांना वाटलेले की अक्षय कुमार हा महादेव शंकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु ट्रेलर मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की अक्षय कुमार देवाची भूमिका करत नसून देवाच्या दूताची भूमिका करतो आहे.

ट्रेलर मध्ये चित्रपटाची गोष्ट ही काही जास्त स्पष्ट झालेली नाही पण थोडा फार निष्कर्ष बांधता येत आहे. पंकज त्रिपाठी एका आस्तिक गृहस्थाची भूमिका साकारत असून त्याच्या मुलाला स्वतःच्या विद्यालयात काहीतरी अडचण होते असे दिसून येत आहे.

त्याचा मुलगा स्वतःचा जीव देण्यासाठी रेल्वे समोर थांबतो आणि झालेल्या घडामोडींना जे लोक जबाबदार आहेत. त्या लोकांना घेऊन पंकज त्रिपाठी न्यायालयात लढा द्यायला सुरुवात करतो अशी साधारण गोष्ट दिसत आहे.

ओएमजी 1 ला घेऊन त्याकाळी बरेच वाद झाले होते. ओएमजी 2 चा टीझर बघूनही चित्रपट वादग्रस्त असण्याची शंका होती. नुकत्याच झालेल्या ओपनहायमर चित्रपटातील श्रीमद भगवद्गीतेच्या वादग्रस्त सीनमुळे सीबीएफसीने चित्रपटावर कठोर निर्णय घेऊन साधारण 20 सिन काढून टाकले आहेत. त्यामुळे यावेळी तमाम नागरिकांच्या धार्मिक विचारांना न दुखवता चित्रपट सुरळीत सिनेमागृहांमध्ये चालेल असे आश्वासन देखील सीबीएफसीने दिले आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.