Pune News : महिला दिनी 75 महिलांनी 75 दिव्यांनी केली महालक्ष्मी देवीची महाआरती

एमपीसी न्यूज – श्री महालक्ष्मी माता की जय… श्री सरस्वती, श्री महाकाली माता की जय… या नामघोषासोबतच भारत माता की जय… चा जयघोष सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात झाला. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 महिलांनी 75 दिव्यांनी महालक्ष्मी देवीची महाआरती केली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे महाआरती व महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन मंदिरात करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह जैन सोशल ग्रुप पुणे सेंट्रलचे मार्गदर्शक हरकचंद सोलंकी, अध्यक्ष मधुमती चोरडिया, सेक्रेटरी माला भंडारी तसेच जैन सोशल ग्रुप पुणे सेंट्रलमधील महिलावर्ग उपस्थित होता.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

अमिता अग्रवाल म्हणाल्या, श्री महालक्ष्मी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम नित्याने राबविले जातात. परंतु जागतिक महिला दिन व भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. स्त्री मध्ये देवीची विविध रुपे असतात. त्यामुळे या महिलांच्या हस्ते देवीची आरती व्हावी, हा यामागील उद्देश होता. तसेच गुलाबपुष्प व प्रसाद देऊन महिलांना सन्मानित देखील करण्यात आले.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.