Wakad : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट विक्री प्रकरणी वाकडमध्ये एकास अटक

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेल्या इम्पोर्टेड सिगारेट आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास वाकड गावठाण येथे करण्यात आली.

Ravet : रस्ता खोदल्या प्रकरणी गुन्हा दाखल

कृष्णकुमार कन्हैयालाल गुप्ता (वय 34, रा. वाकड गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुषार शेटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुप्ता याची एक पान टपरी आहे. त्याने त्याच्या टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या इम्पोर्टेड सिगारेट आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडून 47 हजार 173 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.