Bhosari : भोसरीमध्ये एकाचा मारहाण करत खून

एमपीसी न्यूज – भोसरी येथील बैलगाडा शर्यत (Bhosari) घाटाजवळ एका व्यक्तीला ओढत नेऊन बेदम मारहाण करत तिचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

भास्कर लिंबाजी साळवे (वय 54, रा. आळंदी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आशिष भास्कर साळवे (वय 32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील भास्कर साळवे यांना अज्ञातांनी अज्ञात कारणावरून भोसरी येथील बैलगाडा शर्यत घाटाजवळ नेले. तिथे त्यांना मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी (Bhosari) झालेल्या भास्कर साळवे यांचा मृत्यू झाला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Maharashtra News : राज्यात पाच महिन्यात 88 हजार 108 जणांना मिळाला रोजगार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.