Hinjawadi Crime News : मेव्हण्याला पुण्यात एक किलो सोनं सापडल्याचे सांगून घातला सात लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – जेसीबीवर काम करण्यासाठी आलेल्या एका कामगाराने जेसीबी मालकाला सांगितले कि, ‘माझ्या मेव्हण्याला पुणे येथे खोदकाम करताना एक किलो सोने सापडले आहे. त्यानुसार ते सोने विकण्याच्या बहाण्याने कामगाराने पहिल्याच दिवशी मालकाला सात लाखांचा गंडा घातला. ही घटना 17 मार्च रोजी रात्री साडेसात वाजता जांभे येथे घडली.

गजानन लिंगू पवार (रा. मरडसगाव, ता. गंगाखेड, परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम गोपीचंद ढमढेरे (वय 25, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याला कामाची गरज असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या जेसीबीवर चालक म्हणून काम सुरु केले. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याने मालकाला सांगितले कि, पुण्यात जेसीबीने काम करताना एक किलो सोने सापडले आहे. ते सोने सात लाख रुपयांना विकण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना किलते पाटील रोड, जांभे येथे बोलावले. फिर्यादी पैशांसह जांभे येथे आले असता आरोपीने फिर्यादी यांच्याकडून पैशांची पिशवी घेतली. सोने देण्यासाठी आरोपीने त्याच्या घरी जाण्याचा बहाणा करून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.