Bhosari News : घरात झोपलेल्या महिलेचा गल्लीतील इसमाकडून विनयभंग

एमपीसी न्यूज – घरात झोपलेल्या महिलेचा गल्लीतील इसमाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे शनिवारी (दि.12) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

पिडित महिलेनं याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वसंतराव श्रीधर इपर (वय 61, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी झोपल्या होत्या, त्यावेळी आरोपीने त्यांच्या घरी जात विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.