Pimple Saudagar Crime News : आयडीएफसी बॅंकेला 50 लाखांचा गंडा, कंपनी सुरू करण्याची केली बतावणी

एमपीसी न्यूज – आयडीएफसी बॅंकेला 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने कंपनी सुरू करण्याची बतावणी केली तसेच दोघांच्या नावाने असलेला फ्लॅट स्वतःच्या नावे आहे अशी खोटी माहिती बॅंकेला दिली. सोशल मीडियावर देखील कंपनीचा डायरेक्टर असल्याची बनावट खाते इसमाने निर्माण केले. 09 ऑगस्ट 2016 ते 12 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर, पुणे येथे हा प्रकार घडला.

सुमन ख्यालीदत्त जोशी (वय 40, रा. पिंपळे सौदागर, पुणे) शनिवारी यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ट्रान्समॉन्क इंडिया प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर संदीप सिंह सुलतान सिंह बिस्ट (रा. श्रीनगर गढवाल), मधूर पांडे, कुमार गुरुंग, मनिष पांडे, सुरेंद्र सिंह, राहुल गुरुंग आणि आयडीएफसी बॅंकेच्या कर्ज विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप सिंह याने लक्षदीप, पिंपळे सौदागर येथे दोघांच्या मालकीचा असलेला फ्लॅट स्वतःच्या मालकीचा असल्याचे सांगून ट्रान्समॉन्क इंडिया प्रा. लि. कंपनी सुरू करणार असल्याची बतावणी केली. त्यासाठी आयडीएफसी बॅंकेतुन 50 लाख रुपयांचे कर्ज काढले. बॅंकेच्या कर्ज विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता कर्ज मंजूर केले. सिंह याने सोशल मीडियावर देखील कंपनीचा डायरेक्टर असल्याची बनावट खाते इसमाने निर्माण केले. असे फिर्यादीत नमूद केले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.