Maharashtra Legislative Council : विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी  सोमवार दि. (10 जून)रोजी मतदान होणार(Maharashtra Legislative Council) आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक (7 जुलै) रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.  त्यामुळे आयोगाने 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी बुधवार दि. (15 मे) रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार दि.(22 मे)  पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, दि.(24 मे)  रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार दि. (27 मे) अशी (Maharashtra Legislative Council)आहे.

सोमवार दि.(10 जून) रोजी सकाळी 8  ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार (दि.13) जून रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 18 जून रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Loksabha Election: मावळमध्ये 77 टक्के, पुणे 61 टक्के, शिरुरमध्ये 64 टक्के मतदार चिठ्ठ्यांचे वितरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.