Kothrud : अनाथ विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय मेहंदी प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – सुदीक्षा फाउंडेशन, कोथरूड, (Kothrud) पुणे यांचेतर्फे संपर्क बालग्राम, भाजे मळवली येथील अनाथ विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय मेहंदी प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

Monsoon News : मान्सून अंदमानात धडकला; जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येणार महाराष्ट्रात

या प्रसंगी अ‍ॅडव्होकेट गजानन बनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनिता अगरवाल, प्रोप्रायटर अनिता एंटरप्रायझेस या शिबिराच्या प्रायोजिका होत्या. मेहंदी प्रशिक्षण व मार्गदर्शन ईशरत मुन्शी ईशा यांनी दिले.

या प्रसंगी बोलताना सुदीक्षा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन यांनी मुलींना आपल्यातील कलागुण ओळखून त्यांचा विकास करुन आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असे विचार मांडले. (Kothrud) बनकर यांनी मुलींना बालग्राम येथून चांगल्या संस्कारांची शिदोरी घेऊन भारताचे चांगले नागरिक व्हा असे आवाहन केले.

खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षका ईशरत मुन्शी यांनी प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिले. यावेळी त्यांनी त्यांचा वाढदिवसही सर्वांबरोबर केक कापून साजरा केला. प्रशिक्षणार्थिंनी वर्गात मनापासून भाग घेतला आणि परत कधी येणार असेही विचारले.

आभार सुदीक्षा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन यांनी मेहंदीचा सराव करा. आपण सेलिब्रिटींना हातावर मेहंदी काढायला बोलवून कार्यक्रम आयोजित करू असे प्रशिक्षणार्थी मुलींना सांगितले. संपर्क बालग्रामधील मुलांनी स्वतः पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.