Wakad : दारू प्यायला जाण्यास नकार दिल्याने रिक्षा चालकाला बेदम मारहाण

तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दारू प्यायला जाण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून एका रिक्षा चालकाला बॅटने डोक्यात मारून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (दि. 20) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पंचवटी कॉलनी गजानन नगर, काळेवाडी (Wakad) येथे घडला.

Kothrud : अनाथ विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय मेहंदी प्रशिक्षण

सोनबा राजाराम पवार (वय 30, रा. श्रीनगर, थेरगाव) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक सातपुते (वय 25, रा. रहाटणी) आणि त्याच्या दोन मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना दारू पिण्यास चल, असे म्हटले. फिर्यादी यांनी त्यासाठी नकार दिला. त्यावरून आरोपींनी फिर्यादींना बॅटने डोक्यात मारले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले.

हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी आणि भाची आल्या असता त्यांनाही आरोपींनी हाताने मारहाण केली. पोलिसात तक्रार करणार असल्याचे म्हटल्याने आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.