Monsoon News : मान्सून अंदमानात धडकला; जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येणार महाराष्ट्रात

एमपीसी न्यूज – नैऋत्य मोसमी वारे (Monsoon News ) अंदमान परिसरात वाहू लागले आहे. ‘मोचा’ या चक्रीवादळामुळे अंदमानात भरपूर पाउस पडण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार येथून केरळमार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. अंदमानात सुरु झालेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी जूनचा दुसरा आठवडा लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Pune : पतीकडून चारित्र्यावर संशय, 59 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

मागील काही वर्षांचा अंदाज लक्षात घेता 21 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र यावर्षी अंदमानात दोन दिवस अगोदर आगमन झालेला मान्सून (Monsoon News) 4 जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होईल. अंदमान-निकोबार आणि बंगालच्या उपसागरात पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून प्रगती करेल.

यावर्षीच्या मान्सून मध्ये 96 टक्के पाउस पडले, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच यामध्ये पाच टक्के कमी-अधिक पाउस पडेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचेही सावट असण्याची शक्यता आहे.

साधारपणे नऊ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. डोंगराळ भाग वगळता सर्व भागात उष्ण आणि दमट परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पोषक ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.