Pune : पुण्यात फिडर बॉक्सला चिकटून एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील वडगाव धायरी (Pune) परिसरात उच्च दाबाच्या फिडर बॉक्सला चिकटून भंगार गोळा करणाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शफीक बशीर कुरेशी (वय 39, मिरेकर वस्ती, हडपसर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कुरेशी हा भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तो वडगाव बुद्रुक परिसरात भंगार गोळा करत होता. भंगार गोळा करत असताना धायरी फाटा येथील कॅनलशेजारी असणाऱ्या उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्होल्टेजच्या फिडर बॉक्सला चिकटून जागीच मृत्युमुखी पडला.
शफीक याला 12 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. कुटुंबातील शफीक (Pune) हा एकटाच भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. पुढील तपास सिंहगड पोलिस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.