SSP University: एसएसपी युनिव्हर्सिटीचा हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी करार

एमपीसी न्यूज : हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्याचे आपले सामाजिक दायित्व जपण्यासाठी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने (SSP University) एनर्जी स्वराज्य फाउंडेशन बरोबर संयुक्त सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. एनर्जी स्वराज्य फाउंडेशन बरोबर करार करणारी एसएसपीयु ही भारतातील पहिलीच युनिव्हर्सिटी ठरली आहे.

 

या समारंभास एनर्जी स्वराज्य फाउंडेशनचे डॉ. चेतन सिंग सोलंकी,प्रभारी कुलगुरु डॉ. गौरी शिरूरकर, कुलपती सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (SSP University) डॉ स्वाती मुजुमदार सिंबायोसिसमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या संयुक्त सामंजस्य करारामध्ये सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि एनर्जी स्वराज फाउंडेशन यांनी जगावरील हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढील उपक्रम राबविण्यास संयुक्तपणे सहमती दर्शवली आहे.

Pimpri Corona Update : रुग्णसंख्या घटली! शहरात आज 26 नवीन रुग्णांची नोंद; 27 जणांना डिस्चार्ज

(a) ऊर्जा साक्षरता:  वातावरणामध्ये उत्सर्जित होणारे कार्बन डायऑक्साईड आणि इतर कार्बन संयुगांचे प्रमाण (कार्बन फूट प्रिंट) कमी करण्यासाठी समाजामध्ये ऊर्जा साक्षरतेची नितांत गरज आहे.(SSP University)ही आपली संयुक्त जबाबदारी आहे. तसेच अधिक नागरिकांना ऊर्जा साक्षर करण्यासाठी प्रयत्नशील असणे.

(b) ऊर्जेचा वापर कमी करणे: एनर्जी स्वराज फाउंडेशन आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे सौर उर्जेचा वापर 100% आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.

(c) ऊर्जा साक्षरतेचे महत्त्व आणि मानवी समाजावर हवामान बदलाचा प्रभाव याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीद्वारे ऊर्जा स्वराज यात्रा आयोजित करणे.

(d) सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये एनर्जी स्वराज क्लब हे ऊर्जा वापर कमी करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. तसेच हवामान बदलाच्या परिणामांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करेल.

(e)  उर्जेचा वापर कमी करण्यासाठी प्रत्येकाला या कार्यक्रमात सहभागी करून घेणे आणि विद्यार्थी, शिक्षकांना एक वर्ग खोली 100% सौरऊर्जेवर सुरू करण्याचे मिशन दिले जाईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.