Pune : महापालिकेतील भ्रष्टाचाराला केवळ गिरीश बापट जबाबदार – वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज – महापालिकेत भाजप केवळ भ्रष्टाचार करीत आहे. याला खासदार गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहताना शहराच्या  ‘पालकत्वा’ची जबाबदारी नीट सांभाळली नाही, असा आराेप खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विविध सेल मार्फत पुढील काळात सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. युवती सेलच्यावतीने स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि आराेग्यविषयक समस्या या विषयावर उपक्रम राबविले जाणार आहेत. तर महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे चकाचक पुणे राष्ट्रवादीच्या साथीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांच्यासंदर्भात महापािलकेतील पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकार परीषदेत उपक्रमांची माहिती देताना महापािलकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे, विराेधी पक्षनेते दिलीप बराटे, स्वाती पाेकळे, अश्विनी परेरा, सुषमा सातपुते आदी उपस्थित हाेते.

महापालिकेतील विविध प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियांतील घाेळाचा उल्लेख करीत चव्हाण म्हणाल्या, ‘‘भाजपाचा अडीच वर्षाचा कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेलला आहे. शहराची अधाेगती यांच्यामुळे हाेईल. खासदार गिरीश बापट यांनी अधिकारी आणि  पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनीच पदाधिकारी वाढीव दराच्या निविदा मान्य करायला सांगत असल्याचा खुलासा केला. पालकमंत्री म्हणून बापट यांनी यापूर्वी आढावा बैठका घेतल्या आहेत, तरीही भ्रष्टाचार सुरूच आहे. त्यांनी पालकत्व  नीट सांभाळले नसल्यानेच ही परीस्थिती निर्माण झाली आहे.’’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.