Talegaon : प्रेमगंध मेडिटेशन तळेगाव शाखेचे उद्घाटन

एमपीसी  न्यूज –  गुरुवर्य मनोज जैन वडगाव शेरी, पुणे यांनी स्थापन केलेल्या ‘प्रेमगंध ध्यान साधना परिवार’ या संस्थेच्या ‘प्रेमगंध मेडिटेशन’ तळेगाव या शाखेचे उद्घाटन तळेगाव येथे झाले.

तळेगाव  येथील योगीराज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका प्राची हेंद्रे, माजी नगरसेविका सुरेखा आवारे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अविनाश पाटील, डॉक्टर जातेगावकर एमपीसी न्यूज पोर्टलचे वार्ताहार विवेक इनामदार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आरती मनोज जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सुविधा शिंदे उर्फ विदेही यांनी  मनोज जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानसाधना घेतली. तळेगाव वासियांना ही सुवर्ण पर्वणी असल्याचे योगशिक्षिका ज्योती मुंगी यांनी सांगितले. प्रेमगंध साधनेद्वारे आनंदी जीवन, निर्भयता, तणाव मुक्ती, मनशांती व सुखी जीवन जगण्याची अवगत होते.  दिवाकर हेजिब यांनी प्रेमगंधचा अध्यात्मिक अर्थ आपल्या  भाषणात सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. सारिका कशाळीकर व राधिका केकरे यांनी आभार मानले. मान्यवरांचे आरती जैन व मनोज जैन यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. योगीराज हॉलचे आशिष पाठक यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन संजय दाभाडे, शंकर रागमहाले, सदाशिव (अण्णा) माने, संदीप खाणेकर, सागर कार्लेकर, श्वेता दाभाडे व शुभदा झांबरे यांनी केले. रविवार दि. 9 सप्टेंबरपासून प्रत्येक रविवारी सायंकाळी 4-ते 6 वाजता नि:शुल्क ध्यान वर्ग लायन्स क्लब हॉल, तळेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.