Talegaon Dabhade : बर्ड फ्लू बाबत जनजागृतीसाठी मावळ परिसरात अभ्यास दौ-याचे आयोजन

एमपीसी न्यूज : मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या वतीने तालुक्यात बर्ड फ्लू बाबत जनजागृती आणि संघटना बांधणी यासाठी शुक्रवारी (दि.5) रोजी नाणे मावळ परिसरात अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले होते.

या दौ-यात तालुक्यातील बर्ड फ्लूची काळजी तसेच त्यासाठी करण्यात येणा-या उपाय योजना या बाबतच्या सूचना गाव पातळीवरील पोल्ट्री व्यावसायिकांना देण्यात आल्या.तसेच त्यांच्या अडचणी व निर्माण झालेले प्रश्न यावर चर्चा करण्यात आली.या दौ-यात जांभूळ, साते, मोहीतेवाडी, अहिरवडे, ताजे, पिंपोळी,औंढोली,वडिवळे, सांगीसे, आदि गावातील शेतकरी आपापल्या गावात सहभागी झाले होते.

या व्यवसायावर येत असलेल्या संकटांना सर्वजणांनी धीराने सामना करून तसेच दैनंदिन अडचणी सामुदायिकपणे सोडवाव्यात.यामध्ये न सुटणा-या बाबींना  संघटना सहकार्य करेल.

या दौ-यात संघटक सोनबा गोपाळे गुरुजी,अमोल केदारी, प्रवीण शिंदे,प्रमोद गरुड,संभाजी केदारी, एकनाथ गाडे, तुषार गाडे, अमोल आगळमे आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.