Pune News : अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त दृष्टीहीनांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज – अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांची 04 जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली. लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखेच्या वतीने दृष्टीहीनांसाठी खुल्या गटातील स्पर्धेचे शिवाजीनगर येथे आयोजन केले. यामध्ये मराठी व इंग्रजी ब्रेल वाचन, सुगम गायन, काव्यवाचन अशा स्पर्धांचा समावेश होता. 

स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी नगरसेविका प्राची आल्हाट, आशिष आल्हाट, उद्योगपती महेन्द्र जाधव, प्रहार संघटनेच्या विद्या ठिपसे, पोलिस मित्र मंडळाच्या उपाध्यक्षा रूपा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे प्रायोजकत्व युनियन बँक आँफ इंडिया, शिवाजीनगर यांनी केले.

समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक आँफ इंडियाचे पुणे पुर्वचे जनरल मॅनेजर गुरू प्रसाद, रिता इंडिया फाऊंडेशनच्या संस्थपिका रिता शेटीया उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष जनार्दन कोळस, महासचिव शिवाजी लोंढे तसेच कोषाध्यक्ष सुशील पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रकाश नवले, संघटनेचे मानद अध्यक्ष कुलदीप रावळ, शांताराम जाधव, यशवंत वाघमारे, अंजना झोजे, संगिता पवार, राजेंद्र थोरात, सुनील सुर्यवंशी, विशाल पवळे इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी रिता शेटीया यांच्यातर्फे दृष्टीहिनांसाठी 200 सॅनिटायझर वाटण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महासचिव शिवाजी लोंढे यांनी केले. संघटनेचे सचिव सदानंद जन्नु यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.