Talegaon Dabhade News : जैन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना सलग चौथ्या वर्षी गुणवत्ता यादीत स्थान

शिष्यवृत्ती परीक्षेत जैन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांना यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जैन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर विशेष प्राविण्य मिळवून गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा चौथ्या वर्षी कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2021मध्ये घेण्यात आल्या. यामध्ये जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर विशेष प्राविण्य मिळवून गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवून अद्वितीय यश प्राप्त केले आहे.सलग चौथ्या वर्षी गुणवत्ता यादीत जैन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी नेत्रदीपक यश संपादित करुन शाळेचे नावलौकिक द्विगुणित करत आहेत.

यावर्षी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.सर्वज्ञ गणेश अनाप, मावळ तालुका शहरी विभागातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर जिल्हास्तरावर त्याने 55 वा क्रमांक संपादित केला. कु.पलक प्रविण पाटील हीने तालुकास्तरावर द्वितीय तसेच जिल्हा स्तरावर 234 व्या क्रमांकाने यशस्वी होण्याचा सन्मान मिळवला.

तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हर्षवर्धन मुकुंद पवार मावळ तालुका शहर विभागातून प्रथम क्रमांकाने यशस्वी झाला तर जिल्हास्तरावर 20 वा क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाला. कु.हर्षवर्धन हरीभाऊ कुलकर्णी हा देखील मावळ तालुका शहर विभागात द्वितीय क्रमांक तर जिल्हा स्तरावर 124 वा क्रमांक मिळवून यशाचा मानकरी ठरला. कु.गायत्री सुशील भेगडे ही तालुक्यामध्ये तिस-या क्रमांकाने व जिल्हा स्तरावर 253 वा क्रमांक मिळवून यशस्वी ठरली.

कु. गार्गी संदिप लिंगायत हीने तालुका स्तरावर चवथ्या क्रमांकाने यशस्वी होऊन बाजी मारली तसेच जिल्हा स्तरावर 296 वा क्रमांकाची संपादणूक करुन यशस्वी झाली. सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून प्राविण्य मिळवून तळेगाव तसेच मावळ तालुक्यात सर्व स्तरावर मानाचा तुरा रोवून जैन इंग्शिन स्कूलला नेत्रदीपक यश मिळवून दिले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका विजया शिंदे तसेच विपूल भुसारे ( तज्ञ मार्गदर्शक ) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. गरुडझेप घेऊन यश संपादित केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे अभिनंदन शाळेच्या तीनही विभागाच्या मुख्याध्यापिका, संचालक मंडळ व शिक्षक वृंदाने केले. जैन इंग्लिश स्कूल सदैव अशीच यशस्वी वाटचाल करत राहील अशी शुभेच्छा संचालक मंडळाद्वारे देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.