Osmanabad News: नळदुर्गच्या साखर कारखान्यातील 42 हजारांचे साहित्य चोरीस

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना येथे सुमारे 42 हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी झाली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना गेल्या दहा वर्षांपासून बंद आहे. कारखाना परिसर सतत निर्मनुष्य असतो. यामुळे कारखान्यातील अनेक वेळा साहित्य चोरीस गेले आहे.

त्यातच 42 हजार 500 रुपये किंमतीचे प्लॅन्जड सीआय व एक कन्टीन्युअस सेपरेटर मशिनचे सुटे भाग अज्ञात चोरट्याने 8 ऑक्टोबरला रोजी चोरुन नेले आहेत. याप्रकरणी साखर कारखाना कर्मचारी विकास बाबूराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.