Osmanabad News : शरद पवारांच्या दौऱ्यात शिवसेना आमदाराची सोनसाखळी चोरीस

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे चोरट्यांचे फावले

0

एमपीसी न्यूज – अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा दौरा सुरू असताना दौऱ्यात सोबत असणारे उमरगा-लोहाऱ्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात चोरट्यांनी पळविली आहे.  या प्रकरणी पोलिस तपास करत आहे.

परतीच्या पावसाने उस्मानाबादमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केले आहे. यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत.
खासदार शरद पवार यांनी सुरुवातीला लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. परतीच्या पावसामुळे कधी न भरून येणार नुकसान झाले आहे. या संकटाला खचून न जाता एका धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांच शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असंही शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, रविवारी सकाळी खासदार शरद पवार सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी हेलिकॉप्टरने तुळजापूर येथे दाखल झाले. खासदार शरद पवार हे उस्मानाबादेत येणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ तोबा गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.