Osmanabad Rain : हंगरगा गावात शिरले पाणी

एमपीसी न्यूज (उस्मानाबाद) – मुसळधार पावसामुळे हंगरगा (तुळ) गावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे त्यामुळे गावातील नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे व पावसाच्या पाण्यामुळे हंगरगा गावामध्ये ये-जा करण्याचे वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. 

तसेच गावाशेजारील शेतीत पाणी शिरल्यामुळे शेतीचे ही मोठे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करुन आर्थिक मदत देण्यात यावी.

हंगरगा तुळ हे गाव दोन तलावाच्या मध्यभागी येत असून पाचुंदा तलाव लिकेज झाल्यामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे तसेच गावाच्या खालील बाजूस
असलेल्या दुसऱ्या तळ्यामुळे गावात पाणी शिरले आहे.

गावाची अनेक वर्षांपासून असलेली पुनर्वसनाची मागणी आता तरी प्रशासन गांभिर्याने घेईल का, असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.