Pune : आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला नवजात मुलीचा अवयव वाचविण्यात यश

एमपीसी न्यूज – आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल  (Pune) या मल्टीस्पेशालिटी टर्शरी केअर हॉस्पिटलने नवजात मुलीचा अवयव यशस्वीरित्या वाचवला, जिचा उजवा पाय सुजलेला होता आणि तिच्या शरीराच्या इतर भागापासून जवळ-जवळ अलिप्त होता.

रिया (नाव बदललेले) हिचा जन्‍म महाराष्ट्रातील उस्‍मानाबाद येथील ग्रामीण भागात झाला. सरकारी हॉस्पिटलमध्‍ये या मुलीची प्रसूती झाली. ही प्री-मॅच्‍युर (प्रसूतीकाळ पूर्ण होण्‍यापूर्वी) प्रसूती होती, मुलीचे वजन जन्‍मत: कमी होते, तसेच उजव्‍या पायाला अॅम्‍नीओटिक बॅण्‍ड सिंड्रोमचा (जेथे बाळाच्‍या शरीराच्‍या भागामधील अॅम्‍नीओटिक कॉर्ड घट्ट होते, ज्‍यामुळे आपोआप अॅम्‍प्‍युटेशन होते) त्रास होत होता.

उजव्‍या पायाला सूज आली होती. विकृत होण्‍यासह जवळपास तिच्‍या शरीराच्‍या इतर अवयवापासून अलिप्‍त होता, ज्‍यामुळे त्‍वचेच्‍या लहान लायनिंगवर लटकत होता. हॉस्पिटलमध्‍ये डॉक्‍टरांनी प्रसूतीपूर्व डिलिव्‍हरी व उजव्‍या पायाचे संभाव्‍य अॅम्‍प्युटेशन (विच्‍छेदन) यामुळे तिच्‍या जीवाला धोका असल्‍याचे सांगितले. हे ऐकून कुटुंब अस्‍वस्‍थ झाले आणि मुंबईतील किंवा पुण्‍यातील प्रगत आरोग्‍यसेवा केंद्रामध्‍ये मुलीला घेऊन जाण्‍याचे ठरवले. लष्करी अधिकारी असल्याने वडिलांनी पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथे मुलीला घेऊन जाण्‍याचे ठरवले. कारण त्यांना उत्तमरित्‍या केअर घेण्‍याचा व लवकर बरे होण्‍याबाबत पूर्वीचा अनुभव होता.

 

नवजात मुलीला 9 दिवसांची असताना आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले. अवयवातील विषारी द्रवाचा नवजात मुलीच्‍या आरोग्‍यावर परिणाम होत होता. तिच्‍या शरीरातील (Pune) पाण्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. तिला ताप व श्‍वसनाचा त्रास होत होता. फक्‍त 9 दिवसांची आणि वजन कमी असल्‍यामुळे कोणत्‍याही शस्‍त्रक्रियेचे नियोजन करण्‍यापूर्वी तिची स्थिती स्थिर करणे आवश्‍यक होते.

आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे निओनॅटोलॉजिस्‍ट डॉ. हेमंत पाटील यांनी आव्हान स्वीकारले आणि नवजात मुलीला सेप्टिसीमियातून बाहेर काढले. एकदा ती स्थिर झाल्यावर अवयव व बाळाचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्‍यामुळे निओनॅटोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, फिजिशियन आणि इतरांसह डॉक्टरांच्या पॅनेलने केसच्या गुंतागूंतींवर चर्चा केली.

Satyam Jewellers : सत्यम ज्वेलर्सच्या दागिन्यांचे ‘पुणे टाइम्स फॅशन वीक’मध्ये कौतुक

त्यानंतर कुटुंबाचे समुपदेशन करण्‍यात आले आणि त्‍यांना सांगण्‍यात आले की, डॉक्टरांची टीम मायक्रोव्हस्कुलर शस्त्रक्रियेचा प्रयत्न करणार आहे. ज्यामुळे नवजात मुलीचे अवयव वाचवण्याची शक्यता वाढेल. कुटुंबियांनी डॉक्टरांना परवानगी दिली. पायातील आकुंचन पावलेला भाग आणि लिक्विड बाहेर काढण्‍याचे पहिले आव्‍हान होते.

म्‍हणून आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथील डॉ. सोमनाथ कराड व डॉ. विक्रम आर. वाघ यांच्‍या प्‍लास्टिक सर्जरी टीमने गुंतागूंतीची लिम्‍ब साल्‍वेज सर्जरी केली आणि पायामध्‍ये जमा झालेले द्रव बाहेर काढण्‍यासाठी अनेक रोटेशन प्रगत फ्लॅप्‍स केले. शस्‍त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी अवयवाला आलेली सूज कमी होऊ लागली आणि 7 व्‍या दिवशी अवयवाचा आकार सामान्‍य झाला. ऑपरेशननंतर अवयव वाचला आणि इतर अवयवांप्रमाणे वाढू लागला.

 

बोन रिस्‍ट्रक्‍चरिंगची आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे, जी डॉ. श्रीरंग कुलकर्णी करणार आहेत, जेणेकरून अवयव शरीराचे वजन उचलून स्थिर होऊ शकेल. ही शस्‍त्रक्रिया लवकरच करण्‍यात येईल. यामुळे नवजात मुलगी सामान्‍यपणे हालचाल करण्‍याची व चालण्‍याची खात्री मिळेल.

नवजात मुलगी पूर्णपणे स्वस्थ असून तिला डिस्‍चार्ज देण्‍यात आला आहे. हे मोठे यश आहे, कारण ही टाइप 3 अॅम्‍नीओटिक बॅण्‍ड सिंड्रोमची दुर्मिळ केस आहे, जेथे सामान्‍यत: अवयवांभोवती आंकुचित भाग असलेले बाळ विकृत शरीराच्‍या भागाच्‍या ऑटो अॅम्‍प्‍युटेशनसह जन्‍माला येतात. अॅम्‍प्‍युटेशन (शवविच्छेदन) हा एकमेव उपाय नाही आणि वेळेवर व योग्य उपचार दिल्यास अवयव वाचवता येतात, याची पालकांमध्ये जागरूकता असणे महत्त्वाचे आहे,’’ असे आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे प्‍लास्टिक सर्जन डॉ. विक्रम वाघ म्‍हणाले.

नवजात मुलीचे वडिल म्‍हणाले, माझ्या नवजात मुलीचा जीव व तिचे अवयव वाचवल्‍याबद्दल मी आदित्‍य बिर्ला मेमोरियल येथील डॉक्‍टर्स व संपूर्ण वैद्यकीय टीमचे अभार मानतो. आदित्‍य बिर्ला मेमोरिअल येथे अत्‍यंत कमी वजन असलेल्‍या तान्‍ह्या मुलांची काळजी, लाइव्‍ह निओनॅटल केअर, बॉडी वॉर्मर व चोवीस तास डॉक्‍टरांची देखरेख आणि स्‍पेशालिस्‍ट प्‍लास्टिक सर्जन व प्रगत ऑपरेटिंग सुविधा असल्‍यामुळे हे सर्व शक्‍य झाले. मी त्‍यांचे जितके आभार मानेन ते कमीच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.