Parandwadi : दुचाकीस्वाराला मारहाण करत दुचाकी चोरली

एमपीसी न्यूज – दुचाकीस्वाराला अडवून त्याचा मोबाईल (Parandwadi )फेकून देत मारहाण करत त्याची दुचाकी चोरून नेल्या प्रकरणा तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हि घटना परंदवाडी येथील एक्सप्रेसवेवर जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (दि.17) घडला आहे.

याप्रकरणी तानाजी दत्तू पडवळ (वय 45 रा. ओझर्डे, मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात(Parandwadi)फिर्याद दिली आहे. यावरून शिरगाव पोलिसांनी बाबू वाळूंज व सोमनाथ मसुडगे,राहूल ओझरकर तिघे रा. मावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Worldcup 2023 : दक्षिण आफ्रिका पुन्हा चोकर्स; नेदरलँड कडून 38 धावांनी पराभव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे तोंडओळखीचे आहेत. फिर्यादी यांना आरोपीने अडवून फिर्यादी यांचा खिशातला फोन काढून लांब फेकून दिला. तसेच टोकदार शस्त्राने मारहाण करत,याची विकेट टाका अशी धमकी देत मारहाण केली. दरम्यान ते फिर्यादीची 50 हजार रुपयांची दुचाची चोरून पळून गेले. यावरून शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.