Pimpri : कोरोनाबाधित महिला आढळल्याने पिंपळे गुरवमधील काही भाग ‘सील’

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील एका 25 वर्षीय महिलेचा रिपार्ट आज, रविवारी (दि. 19) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने रविवारी रात्री अकरा वाजल्यापासून पिंपळे गुरव मधील काही भाग सील करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

नरेंद्र सुपर मार्केट – महालक्ष्मी सुपर मार्केट – शेती परिसर -हरसिद्धी अपार्टमेंट – नदीच्या बाजूचा परिसर – मोरया पार्क रोड – आयनॉक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल – साठ फुटी रोड – नरेंद्र सुपर मार्केट हा परिसर सील करण्यात येणार आहे. रविवारी रात्री अकरा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत हा भाग सील राहणार आहे.

वरील परिसरात प्रवेशबंदी तसेच परिसरातून बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सील केलेल्या परिसरात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

पिंपळे गुरव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून सध्या शहरात 37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दोघेजण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 17 जण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.