Pimpri : पीसीसीओईचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने (पीसीसीओई) संघाने रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्ट्स फुटबॉल स्पर्धेतील कॉलेज बॉइज गटात डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी संघावर १०-० असा मोठा विजय मिळवला.

पीसीएमसीच्या हेडगेवार मैदानावर झालेल्या या लढतीत पीसीसीओई आणि डी. वाय पाटील यांच्यातील लढत एकतर्फी झाली. पीसीसीओईकडून मुकुल घारेने (२, ३८. ४३ मि.) तीन गोलनोंदविले, तर आदर्श वानखेडेने (८,१० मि.) दोन गोल केले. अमेय तळेगावकर (७ मि.), शुभम नेसर्गी (९ मि.), हेमल गोखले (१४ मि.), रिशी सपकाळ (३५ मि.) आणि आशिष खडसरे (४१मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. इतर लढतीत पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगने पीसीसीओई, रावेतचा १-०ने पराभव केला. आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने मॉडर्न कॉलेजवर ५-०ने मात केली. केईएस प्रतिभा कॉलेजने एस. बी. पाटील कॉलेजवर टायब्रेकमध्ये ४-२ने विजय मिळवला.

निकाल :

कॉलेज बॉइज : १) डी. वाय. पाटील एचएमसीटी – ५ (वैष्णव कदम ३ मि., जेसन निकोल्स १४, १६ मि., लुकास फ्रान्सिस १८, १९ मि.) वि. वि. प्रो. रामकृष्ण मोरे एसीएस कॉलेज – ३(अनुपम अल्हाट ४ मि., रोहन सरडे ४४ मि., अविनाश ४८ मि.).

२) डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, पिंपरी – १ (पियूष मांजरेकर ८ मि.) वि. वि. पीसीसीओइ, रावेत – ०.

३) डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी – ५ (सुबोध फडे ६, १२ मि., अनुप कोंबे २४ मि., हर्ष तेजवानी २५ मि., रिषभ शुक्ला ४४ मि.) वि. वि. मॉडर्न कॉलेज ऑफकॉमर्स अँड कम्प्युटर स्टडी – ०.

४) पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग – १० (मुकुल घारे २, ३८, ४३ मि.,अमेय तळेगावकर ७ मि, आदर्श वानखेडे ८, १० मि., शुभम नेसर्गी ९ मि., हेमल गोखले १४ मि., रिशीसपकाळ ३५ मि., आशिष खडसरे ४१ मि.) वि. वि. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पिंपरी-०.

५) केईएस प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडिज – १ (४) (प्रतिक यादव ५ मि., रोहन पाटील, जतिन पलांडे, आयूष वामन, गौरव परदेशी) वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफसायन्स अँड कॉमर्स – १ (२) (रुचित एम. ३७ मि., फरहान, रिहान मन्यार).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.