PCMC News : शहराची विकासाच्या दिशेने झेप, पालिकेचा मंगळवारी 40 वा वर्धापनदिन  

एमपीसी न्यूज – औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड (PCMC News) शहराने विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे. ‘कटिबद्धा जनहिताय’ हे ब्रीदवाक्य सार्थ करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 40 वा स्थापना दिवस उद्या (मंगळवारी) साजरा होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी 10 वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.(PCMC News) या कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे.  खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, आमदार लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, उमा खापरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे , जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहेत.

Bank license cancel :  ‘आरबीआय’कडून सेवा विकास बँकेचा परवाना रद्द

सकाळी दहा वाजता महापालिकेच्या पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये मानवतेसाठी महान दान असणारे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.(PCMC News)  संगीत खुर्ची, रस्सी खेच अशा स्पर्धा देखील यावेळी घेतल्या जाणार आहेत. दुपारी 12 वाजता चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये महापालिका कर्मचा-यांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित केले आहे. “चला निरोगी जगूया ” या विषयावर  आयुर्वेद तज्ञ डॉ. शिवरत्न शेटे मार्गदर्शन करणार आहेत. उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ दुपारी 1 वाजता पार पडणार आहे. त्यांनंतर दुपारी 2 वाजता महापालिकेतील अधिकारी कर्मचारी ऑर्केस्ट्रा सादर करणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.