Shivsena symbol : ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव, तर शिंदे गट आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’

एमपीसी न्यूज : उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरेहे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे.(Shivsena symbol) उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तर शिंदे गटाला नवीन तिन पर्यांय सुचवायला सांगितले असून बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे.

उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान अद्याप शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालं नाहीये. आयोगाकडून नवीन तीन चिन्हे सूचवा असे शिंदे गटाला सांगण्यात आले आहे.

PCMC News : शहराची विकासाच्या दिशेने झेप, पालिकेचा मंगळवारी 40 वा वर्धापनदिन  

रविवारी सायंकाळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील त्यांनी दाखवून दिले होते. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल (Shivsena symbol) या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले होते. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिली होती.

तसेच निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले होते यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला होता.(Shivsena symbol) शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले होते. यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.