PCMC : अखेर नाट्यगृहाची भाडेवाढ 50 टक्क्यांनी कमी; अमित गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) हद्दीतील नाट्यगृह भाडे वाढीचा पुनर्विचार करून 50 टक्क्याने कमी केली आहे. त्याबाबतचा प्रस्तावला प्रशासकाच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. भाडेवाढ कमी करण्यासाठी भाजपचे अमित गोरखे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

काही दिवसांपूर्वी महापालिकेने नाट्यगृहांची भाडेवाढ केली होती. नाट्यगृहाची मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली होती. तसेच ऑनलाइन बुकिंग यासारख्या विषयांवर विचार विनिमय न करता निर्णय घेण्यात आले होते. या निर्णयांना पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्व कलाकार व नाट्यप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केला होता.

अमित गोरखे यांनी याचा कडाडून विरोध केला. पिंपरी- चिंचवड शहर ही कामगारनगरी तर आहे त्याचबरोबर ती सांस्कृतिक नगरी म्हणून नव्याने उदयास येत आहे. त्यामुळे महापालिकेने घेतलेल्या निर्णयावर नागरिकांमध्ये नाराजी होती आणि ही नाराजी लक्षात घेऊन या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी गोरखे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.

Maharashtra : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सुविधा वाढणार

त्यानुसार भाडेवाडीला स्थगिती देऊन जी भाडेवाढ केली आहे. त्यात 50 टक्के दर महापालिकेने कमी केले. ऑनलाइन बुकिंगही पुढील दोन महिन्यासाठी स्थगित ठेवण्यात आले (PCMC) आहे. त्याचाही विचार लवकरच करण्यात येईल असेही गोरखे यांना आयुक्त यांनी सांगितले आहे.

भाडेवाडी संदर्भात व ऑनलाईन बुकिंग संदर्भात वेळोवेळी अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनाही एकत्रित येऊन याविषयीच्या वेळोवेळी बैठका झाल्या होत्या.

आजच्या निर्णयाने पन्नास टक्केच यश आले आहे असे गोरखे म्हणाले. अजूनही भाडेवाढ कमी व्हावी व ऑनलाईन बुकिंग पूर्णतः बंद व्हावे यासाठी आणखी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी बोलताना सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.